चंदगड /प्रतिनिधी
सीटू संलग्न शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन च्या लढयाला यश राज्यातीत सर्व स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी सिटू सलग्न महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशनच्या वतीने सातत्याने आंदोलान केले. या लढ्याला अखेर यश आले असून शासनाने स्वयंपाकी मदतनीस मानधनामध्ये दरमहा एक हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कामागारानी केलेल्या संघर्षातून ही हक्याची वाढ मिळवून घेतली असून कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटना आणि सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष तथा कॉ. डि.एल. कराड यांनी स्वागत केले आहे.
१९९५ सालापासून शालेय पोषण आहार ही योजना सुरु झाली. सुरुवातीस केवळ ३00 रू मानधन दिले जात होते. महाराष्ट्र राज्य फे डरेशनने गेल्या १५ वर्षापासून सातत्याने मोर्चे व शासना सोबत चर्चा करून आता पर्यंत ३५०० रुपये मानधन वाढविले आहे. त्या शिवाय कोणलाही कामगारांना कामावरून कमी केले जाऊ नये, यासाठी १० जुलै२०१४ व त्यानंतर २२ नोव्हेंबर २ ०२३ रोजी बालभवन मुंबई येथे मा. शिक्षणमंत्री दिपक केसरकर सो यांच्याशी शिष्टमंडळाने केलेली चर्चा व १३ सप्टेंबर २०२३रोजी मुंबई मंत्रालय येथे आंदोलन करून १८ डिसेंबर २०२३ ला सुधारीत आदेश काढायला भाग पाडले. तामिळनाडू राज्या प्रमाणे किमान वेतन, पेन्शन फंड चालू करून शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. पुन्हा एकदा राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शिक्षण मंत्री मा. दिपक केसरकर यांना भेटून फेडरेशनचे सचिव कॉ. डॉ. अशोक थोरात व अध्यक्ष कॉ. प्राचार्य ए. बी . पाटील यांनी चर्चा केली. त्यामुळे ५ जुलै रोजी मानधन वाढीस मान्यता देण्यात आल्याने काही अंशी मागणी मंजूर झाली आहे. त्यामुळे बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व सावंतवाडी येथे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या घरावर आयोजित मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. पुढील काळात इतर प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी फेडरेशनच्या आगामी बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे शालेय पोषण आहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. ए. बी. पाटील सचिव कॉ. निवेदिता वासकर, तानाजी कुंभार,संतोष देसाई. विजय गणाचारी, अर्चना पाटील परशुराम बांदेकर, राजेंद्र सुतार इ. माहिती दिली
No comments:
Post a Comment