माणगाव येथील माजी सैनिकाची पोलीस पदी सिंधुदुर्ग येथे निवड - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2024

माणगाव येथील माजी सैनिकाची पोलीस पदी सिंधुदुर्ग येथे निवड

 

सुरेश यल्लाप्पा मेटकुपी

चंदगड / सी एल वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यातील माणगाव येथील सुरेश यल्लाप्पा मेटकुपी या माजी सैनिकाची सिंधुदुर्ग जिल्हा येथे पोलीस पदावर नेमणूक झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल माणगाव पंचक्रोशीतून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. 

     सुरेश यल्लाप्पा मेटकुपी हे भारतीय सैन्य दलातून 17 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची सैनिकी राखीव कोट्यातून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस पदी निवड झाली असून चंदगड तालुका संजय गांधी निराधार समितीचे सदस्य गुंडू यल्लाप्पा मेटकुपी यांचे ते बंधू आहेत.

No comments:

Post a Comment