चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
पाटणे (ता. चंदगड) येथील श्री छत्रपती शहाजी हायस्कूल व जुनि. काॅलेज येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थांचा पालक, शिक्षक व विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नारायण लांडे होते.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कवी दशरथ (आण्णा) बाबू पाटील यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर ध्येय साध्य करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही. मात्र विद्यार्थ्यांनी मनापासून मोबाईलचा वापर न करता एकाग्रता ठेवून वाचन करून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर ध्येय प्राप्तीचा मार्ग सोपा होईल असे सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते अशोक कदम, माजी शाळां व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश प्रधान यांनीही आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची मानसिकता आणि बुद्धिमत्ता अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या इयत्ता दहावीच्या पालक शिक्षक व विद्यार्थी मेळाव्यात पाटणे, कलिवडे, शेवाळे आणि जेलुगडे गावातील पालक शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संदिप पाटणेकर, नरेंद्र हिशेबकर व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसवंत चिगरे यांनी केले. प्रमोद डुरे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment