गरज पडल्यास विधानसभा निवडणूक लढवणार...! कार्वे येथील बांधकाम कामगारांचा मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2024

गरज पडल्यास विधानसभा निवडणूक लढवणार...! कार्वे येथील बांधकाम कामगारांचा मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद

  

कार्वे येथे बांधकाम संबंधित कामगारांच्या मेळाव्यात बोलताना नारायण व इंगळे सुरत शेकाप चे पदाधिकारी

चंदगड : सी एल वृत्तसेवा  

      चंदगड, आजरा गडहिंग्लज तालुक्यातील बांधकाम संबंधित कामगारांचा मेळावा दि. 9 सप्टेंबर रोजी कार्वे (ता. चंदगड) येथे  संपन्न झाला. शेतकरी कामगार परिवाराच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने आयोजित केलेल्या या मेळाव्यास कामगारांची अभूतपूर्व उपस्थिती होती. 

    यावेळी बोलताना शेतकरी कामगार परिवार संघ व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे चंदगड विधानसभा प्रमुख - भाई नारायण रामू वाईंगडे यांनी  बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक आदी अनेक  योजनांची माहिती दिली. तथापि या योजनांचा लाभ खऱ्या कामगारांना न देता काही अधिकारी, नेते एजंटांमार्फत बोगस कामगार नोंदणीला प्रोत्साहन देवून मूळ बांधकाम कामगारांवर अन्याय करत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासनाची उदासीनता, काही राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप, बोगस कामगारांना सह्या देणारे इंजिनियर, ग्रामसेवक, एजंट हे आहेत. नोंदणी झालेले कामगार खरोखर कामगार आहेत की नाही याची पडताळणी न करता योजनांचा लाभ पुरवणारे अधिकारी यास जबाबदार असल्याचे सांगितले. संघटनेच्या मजबूती साठी बोगस कामगारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी निवेदन देण्याबरोबरच वेळ पडल्यास संबंधित बांधकाम कामगारांच्या योजना  चुकीच्या पद्धतीने लाटणाऱ्यांच्या ऑफिस व घरांवर आक्रोश मोर्चे काढण्याचा तसेच वेळीच बोगस कामगार, एजंट व राजकीय हस्तक्षेप न थांबवल्यास प्रशासनाच्या विरोधात योजनांच्या परिपत्रकाची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ उपोषण करण्याचा इशारा दिला. वेळ पडल्यास बांधकाम कामगारांच्या योजनेत ढवळाढवळ करणाऱ्या राजकारण्यांच्या विरोधात निवडणुकीत उतरण्याची तयारी बांधकाम कामगार आणि ठेवावी असे आवाहन केले.

        बांधकाम कामगारांची पुढील मेळावे या ठिकाणी आयोजित केले आहेत. अडकूर, महागाव, कडगाव, उत्तूर, कोळीद्रे येथे घेण्याचे यावेळी ठरवण्यात आले. यावेळी मोनाप्पा चौगुले, विजयभाई पाटील,  संदीप पाटील, मोहन रेडेकर, संदीप भोगण, यलाप्पा मुतकेकर, नरसु शिंदे, सातेरी मेलगे, रवींद्र पाटील, विठ्ठल गावडे आदी मान्यवरांनी बांधकाम कामगार योजने संदर्भात तसेच संघटना मजबूत करण्यासंदर्भात आपापली मनोगत व्यक्त केली. यावेळी विविध गावांतून बांधकाम कामगार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment