आमरोळी येथे पकडलेल्या दारू साठ्यासह पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर शितल धवीले, पोलीस कॉन्स्टेबल कुशाल शिंदे व इतर कर्मचारी. समोर बसलेला संशयित आरोपी सचिन नाईक
चंदगड : सी एल वृत्तसेवा
आमरोळी (ता. चंदगड) जवळ गोवा बनावटीची २ लाख ६८ हजार ८० रुपये किमतीची दारू चंदगड पोलिसांनी काल दिनांक २४/०९/२०२४ रोजी रात्री ११ च्या सुमारास छापा टाकून जप्त केली. या प्रकरणी अमरोळी येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी आमरोळी गावचा सचिन हावणाप्पा नाईक, वय ३४ वर्षे हा महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने आपल्या कुमरी रोड वरील राहत्या घराच्या मागे गोठ्यात गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांच्या दारू व बियरच्या बाटल्या आपल्या ताब्यात ठेवून विक्री करताना रंगेहात सापडला. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई, 90, 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच्याकडून वरील किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात गोल्डन आईस ब्ल्यू फाईन व्हिस्की, गोल्ड अँड ब्लॅक रम, रिझर्व रेयर, हायवर्ड व्हिस्की, डीएसपी ब्लॅक, व्हिस्की, रॉयल ग्रँड प्रीमियर ग्रीन व्हिस्की, मॅकडोनाल्ड अशा विविध कंपन्यांच्या विविध आकाराच्या बाटल्या विक्रीसाठी आपल्या ताब्यात ठेवून होता. त्याला चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून रंगेहात पकडले. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल नितीन पाटील यांनी चंदगड पोलिसात दिली असून पोलीस सब इन्स्पेक्टर शितल धवीले या अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment