चंदगड : प्रतिनिधी
दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे हे चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीला शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवरांनी त्यांची भेट घेतली. यावेळी कुद्रेमानीचे ग्रामस्थ, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्याध्यक्ष , सीमाकवी आणि पत्रकार रवी पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश पाटील, उद्योजक बाळाराम कदम आणि शिवाजी महादेव गुरव यांनी शुभेच्छा दिल्या.
रवी पाटील म्हणाले, "श्री. खोराटे यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत केली आहे. त्यांचं नेतृत्व सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून आदर्श आहे. चंदगड विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते योग्य उमेदवार ठरतील."
यावेळी माजी सभापती जगन्नाथ हुलजी आणि दौलत ॲग्री ओव्हरसियर नारायण पाटील हे देखील उपस्थित होते. उपस्थितांनी मानसिंग खोराटे यांचे नेतृत्व कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांना यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बेळगाव सीमाभागातील मानसिंग खोराटे प्रेमी कार्यकर्त्यांनी चंदगड तालुक्यातील पै-पाहुणे आणि नातेवाईकांचा आशीर्वाद मिळवून, खोराटे यांचे राजकीय स्थान बळकट करण्यासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी खोराटे यांनी चंदगड तालुक्याच्या विकासासाठी आपले योगदान देण्याची ग्वाही दिली.
No comments:
Post a Comment