कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील वाहतूक व दळणवळणाचे मोठे केंद्र असलेल्या कोवाडमध्ये एसटी महामंडळाने एसटी कंट्रोल पॉईंट सुरू करावा. अशी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून ची मागणी आहे तथापि या मागणीला महामंडळाकडून नेहमीच 'वाटण्याच्या अक्षता' लावल्याचे दिसून आले आहे. याबाबत या प्रश्न शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा चंदगड आगारप्रमुखांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
कोवाड येथे गडहिंग्लज- नेसरी, चंदगड- माणगाव- निट्टूर, चंदगड- ढोलगरवाडी- किणी, बेळगाव- उचगाव होसूर, राजगोळी- कुदनूर- कालकुंद्री- कागणी, कामेवाडी- दुंडगे अशा सहा मार्गावरून महत्त्वाच्या सहा मार्गांवरून एसटी बसेस येत असतात. भागातील शेकडो विद्यार्थी तसेच नोकरदार विविध मार्गांवर शिक्षण व नोकरी निमित्त बस मधून प्रवास करतात. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, ४ व ७ दिवसाचे एसटी पास या सर्व कामांसाठी भागातील प्रवासी, विद्यार्थी व नागरिकांना ४० ते ५० किलोमीटर अंतरावरील चंदगड येथे जावे लागते. यात वेळ व पैसा वाया जात आहे. याचा विचार करून महामंडळाने यापूर्वी च मागणीनुसार कंट्रोल पॉईंट करण्याची गरज होती. तथापि त्याची पूर्तता न झाल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांना देण्यात आले. यावेळी चंदगड तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर, पदाधिकारी विक्रम मुतकेकर, विनोद पाटील, एकनाथ वाके, अर्जून नांदवडेकर, बाबाजी वाके यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
कंट्रोल पॉईंट झाल्यास कोवाड येथून कोल्हापूर, पुणे, मुंबई, बेळगाव, गोवा, अक्कलकोट अशा ठिकाणी जाणारे प्रवाशांचे आरक्षण, एसटी पास काढण्याच्या सुविधेबरोबरच प्रवाशांना वेळापत्रक समजण्यास मदत होईल.
No comments:
Post a Comment