पो. कॉ. कुशाल शिंदे यांचा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी केला सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2024

पो. कॉ. कुशाल शिंदे यांचा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी केला सन्मान

 

कुशाल शिंदे यांना प्रशस्तीपत्रक देताना पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     पोलीस सेवेतील उल्लेखनिय कार्याबद्दल कोवाड पोलीस औट पोष्टचे पो कॉ. कुशाल शिंदे यांचा कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

     कुशाल शिंदे यानी चंदगड पोलीस ठाणे हद्दीत अवैध्यरीत्या बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू वाहतूक व विक्री करणाऱ्या इसमावर/वाहनावर वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत कारवाई करून सुमारे 18,46,195/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त  केला. या प्रकरणातील आरोपीवर गुन्हे दाखल केले. तसेच यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल धविले व इतर स्टाफ यानी केलेल्या कारवाई बद्दल पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या सह इतर सर्व स्फाफलाही प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या उत्कृष्ठ कार्याबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते कुशाल शिंदे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment