तेऊरवाडीच्या शुभम पाटील ची कुस्तीत सुवर्ण कामगिरी - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2024

तेऊरवाडीच्या शुभम पाटील ची कुस्तीत सुवर्ण कामगिरी

 

शुभम पाटील

तेऊरवाडी /सी एल वृत्तसेवा
         तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील श्री राम तालीम मंडळ तेऊरवाडीचा मल्ल कु शुभम जनार्दन पाटील याने कुस्तीमध्ये महिण्यात दोनदा सुर्वण पदके जिंकण्याची सुवर्ण कामगिरी केली. काल सातारा येथे झालेल्या 82 किलो वजनी गटात गिरको रोमन या प्रकारात प्रतिस्पर्धी मल्लांना चितपट करत शुभमने सुवर्ण पदक मिळवले. उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या पुढील स्पर्धांसाठी शुभमची निवड झाली. तसेच १५  दिवसापूर्वी पुणे येथे झालेल्या गिरको रोमन कुस्ती प्रकारात शुभमने सलग  १० मल्लांना आस्मान दाखवत सुवर्ण पदकासह युवा महाराष्ट्र केसरी किताब पटकवला . यानंतर शुभमची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. सलग दोन सुवर्ण पदक जिंकून तेऊरवाडीसह चंदगड तालूक्याचे व जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या शुभमचे सर्व तेऊरवाडी ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन केले जात आहे. शुभमला वडिल जनार्दन पाटील, पै लक्ष्मण भिंगुडे व कोल्हापूरच्या मंल्लांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment