चंदगड / प्रतिनिधी
अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांच्याशी झालेल्या वाटाघाटीनुसार त्यांनी आज जनसुराज्य पक्षात प्रवेश करत एबी फॉर्म मिळवत अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी जनसुराज्य शक्ती पक्षातून उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे.
श्री. खोराटे यांनी निवडणुक लढविण्याचे निश्चित झाल्यापासून त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नंदिनी बाभुळकर यांना उमेदवारी जाहिर झाल्याने या चर्चांना पुर्णविराम मिळाला. जनसुराज्य शक्ती पक्षातून आपला उमेदवारी अर्ज भरताना मानसिंग खोराटे
फॉर्म भरल्यानंतर श्री. खोराटे म्हणाले, `` जनसुराज शक्ती हा माझ्यासाठी एक योग्य पक्ष आहे. एका उमेदवाराला ४ फॉर्म भरायचे संधी असते. त्यापैकी अपक्ष म्हणून मी २ अर्ज दाखल केले होते. उर्वरीत दोन अर्ज आज भरले आहेत.
उमदेवारीबाबत बोलताना ते म्हणाले, ``आमचं विनय कोरे यांच्याशी बरेच दिवस विकास कसा करायचा या विषयावर बोलणे चालू होते. मी व तेदेखील कारखानदार आहेत.. वारणा माळावरचा कारखाना खूप सुंदर चाललेला आहे. त्या अनुषंगाने आम्हाला पण इथे काहीतरी तसंच काहीतरी करायचं होतं. दौलत कारखाना निसर्गरम्य परिसरात आहे. वारणा परिसरात बऱ्याचशा सोयी उपलब्ध आहेत. मी वारणा परिसरात जवळून पाहिला आहे. कारण माझ इंजिनिअरिंगच शिक्षण तेथून झाले आहे.
त्या अनुषंगाने त्यांच्याशी बरेचसे बोलणं झाल्यानंतर मला वाटलं की आपल्यासाठी जनसुराज शक्ती हा एक योग्य पर्याय आहे. मी जर जनसुराज्य शक्ती पक्षातून अर्ज भरला तर विजय पूर्ण करण्यासाठी नक्कीच ताकद मिळेल असे मला वाटते. विनय कोरे यांना राजकारणातील अनुभव असून त्यांचा हा अनुभव मला चंदगड मतदारसंघाच्या प्रगतीपथावर उपयोगात आणायचा आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करुन जनसुराज्य शक्ती पक्षातून उमेदवार अर्ज दाखल केला.
जनसुराज्य पक्ष हा महायुतीमध्ये आहे. याबाबत पक्षप्रमुख विनय कोरे सविस्तर खुलास करतील. पण आज आम्ही जो भरत आहोत हे जनसुराज्य शक्ती युती म्हणून नव्हे. यामध्ये युतीचा काहीही संबंध नाही. केवळ जनशराज्य शक्ती म्हणून फॉर्म भरला आहे.
No comments:
Post a Comment