गोवा येथील स्लो सायकलिंग स्पर्धेत कालकुंद्रीचा प्रथमेश पाटील अजिंक्य - चंदगड लाईव्ह न्युज

10 October 2024

गोवा येथील स्लो सायकलिंग स्पर्धेत कालकुंद्रीचा प्रथमेश पाटील अजिंक्य



चंदगड : सी एल वृत्तसेवा
     साखळी (गोवा) येथील ईगल स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉन, स्लोस्कुटर, स्लो मोटरबाईक व स्लो सायकलिंग स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेतील स्लो सायकलिंग विभागात मूळ गाव कालकुंद्री, ता चंदगड व सध्या बिचोली- गोवा येथे राहणाऱ्या प्रथमेश प्रल्हाद पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता नववी  ते दहावी गटातील मुलांच्या विभागात त्याने हे यश मिळवले. तो आवर लेडी स्कूल बिचोलीम- गोवा शाळेचा विद्यार्थी आहे. बिचोली येथील प्रल्हाद महादेव पाटील यांचा तो मुलगा असून चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक पुढारीचे पत्रकार श्रीकांत पाटील (कालकुंद्री) यांचा तो पुतण्या आहे. त्याच्या यशाबद्दल संपूर्ण गोवा राज्यात त्याचे कौतुक होत आहे. त्याला या कामी आई-वडील व शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment