कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
भाजपचे नेते भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ महाराष्ट्र चे अध्यक्ष व चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे निवडणूक प्रमुख शिवाजीराव श. पाटील गटाच्या वतीने चंदगड येथे 'जय जवान जय किसान' मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता माडखोलकर महाविद्यालय चंदगड येथे होणाऱ्या या मेळाव्यास राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या मेळाव्यात सैनिक व त्यांच्या परिवाराच्या उन्नतीसाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक संघटना व परिवारांना एकत्र आणणे. तिन्ही तालुक्यांमध्ये शहीद स्मारक, सैनिक भवन, भरतीपूर्व प्रशिक्षण तसेच ४०० मीटर बाय ४०० मीटर धावपट्टीची जागा उपलब्ध करणे. शासकीय योजनांची माहिती सैनिक परिवारांपर्यंत पोहोचवणे. सैनिकांच्या विविध समस्या व पेन्शन संदर्भातील तक्रारी सोडवणे. माजी सैनिक परिवाराच्या मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे. शहीद सैनिक परिवार, वीर माता, वीर पिता, वीर नारी व शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करणे आदी उद्देश समोर ठेवण्यात आले आहेत. तर शेतकऱ्यांचा बाबतीत शेतीसाठी चोवीस तास वीज पुरवठा. रासायनिक खते व पशुखाद्य यांच्या किमती कमी करणे. पिक पाहणी तलाठी व पोलीस पाटील यांच्यामार्फतच करणे. दुधाला योग्य दर मिळवून देणे. कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या वर्ग दोन जमिनी मुक्त करणे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक पशु चा विमा शासनामार्फत काढणे. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना किसान पेन्शन चालू करणे. आदी उद्देश पुढील काळात साध्य करण्यासाठी 'एकच ध्यास- राष्ट्र सर्वतोपरी' हे घोषवाक्य घेऊन या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजप नेते शिवाजी पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment