कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथे विजयादशमी दसरा निमित्त श्री स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने खुल्या रस्सीखेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मी देवालय मेन रोड कुदनूर येथे उद्या शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये ८ हजार, ६ हजार, ४ हजार, २ हजार तसेच सर्व विजेत्यांना चषक देण्यात येणार आहेत. तर गाव मर्यादित स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये २०००, १५००, १००० व चषक देण्यात येणार आहेत. प्रत्येक संघात सहा खेळाडू असतील. पंचक्रोशीतील हौशी खेळाडू व संघांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment