चंदगड / प्रतिनिधी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेरडवाडा मराठी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव वरपे(रामपूर) यांनी चंदगड तालुक्यातील भटक्या समाजातील कुटुंबियांसोबत साजरी केली दिवाळी. चंदगड तालुक्यातील भटक्या समाजातील कुटुंबियांच्या भेटीगाठी घेवून दिवाळी सणानिमित्त महिला भगिनींना साड्या, लहान मुलांना कपडे ,साखर-रवा व मैदा, मिठाई वाटप चंदगड परिसर, शिरगांव, हलकर्णी फाटा, पाटणे फाटा व परिसरातील ६० कुटूंबांना वाटप केले. भटक्या समाजातील कुटूंबियांचा दिवाळी व इतर सणांचा आनंद द्विगुणीत करणेचा उपक्रम बाबुराव वरपे गेली काही वर्षे अविरत करत आहेत.तसेच महापूर व कोरोना काळातही सदर कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन त्यांना आनंद देणेचा प्रयत्न केला आहे. तसेच विद्यामंदिर बेरड वाडा (वरगांव)शाळेतील मुलांना दिवाळी अभ्यासिका,शैक्षणिक साहित्य व लाडू चे वाटप करुन त्यांचाही आनंद द्विगुणीत करणेचा प्रयत्न श्री. वरपे यांनी केला आहे.त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेवून शासनाने त्यांना जि.प.कोल्हापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार व इतर अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.
No comments:
Post a Comment