चंदगड मतदारसंघात आज २० तर आतापर्यंत ४५ अर्ज दाखल, राजेश पाटील व विनायक पाटील यांनी भरले शक्तीप्रदर्शनाने अर्ज, मानसिंग खोराटे यांचा जनसुराज्य शक्ती पक्षातून उमेदवारी अर्ज - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2024

चंदगड मतदारसंघात आज २० तर आतापर्यंत ४५ अर्ज दाखल, राजेश पाटील व विनायक पाटील यांनी भरले शक्तीप्रदर्शनाने अर्ज, मानसिंग खोराटे यांचा जनसुराज्य शक्ती पक्षातून उमेदवारी अर्ज

राजेश पाटील उमेदवारी अर्ज दाखल करताना शेजारी संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक.

चंदगड / प्रतिनिधी

चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज दिवसभरात १७ व्यक्तींनी २० अर्ज दाखल केले. तर मतदारसंघासाठी आतापर्यंत ४५ अर्ज दाखल झाले आहेत. ३० ऑक्टोबरला छाननी होणार असून ४ नोंव्हेंबर हि माघारीची मुदत आहे. 

विनायक उर्फ अप्पी पाटील यांचे कार्यकर्ते

आज दिवसभरात आमदार राजेश पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करुन रवळनाथाचा आशिर्वाद घेवून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना आमदार हसन मुश्रीफ, संजय मंडलिक व धनंजय महाडीक हे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे हातात घेवून कार्यकर्ते घोषणा देत शक्तीप्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते.  

     त्याचबरोबर विनायक उर्फ अप्पी पाटील यांनीही चंदगड शहरातून शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला. विनायक पाटील यांनी चंदगड फाटा येथून पायी चालत येत चंदगड शहरातून शक्तीप्रदर्शन केले. त्यांच्यासोबत काँगेसचे गोपाळराव पाटील, उबाठा शिवसेनेचे प्रभाकर खांडेकर व बळीराजा संघटनेचे नितीन पाटील हे देखील उपस्थित होते. 

       आज दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजेश पाटील यांनी २ व त्यांच्या पत्नी सो. सुश्मिता राजेश पाटील यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून २ अर्ज दाखल केलेले आहे. त्याचबरोबर मानसिंग गणपती खोराटे यांनी आज जनसुराज्य पक्षातून २ अर्ज दाखल केले आहेत. परशराम पांडुरंग कुट्रे (रा. केंचेवाडी) यांनी संभाजी ब्रिगेड पक्षातून अर्ज दाखल केला आहे. अर्जून मारुती दुंडगेकर (रा. दुंडगे) यांनी वंचित मधून अर्ज दाखल केला आहे. 

त्याचबरोबर अपक्ष म्हणून 

      अशोक शंकर आर्दाळकर (रा. अडकूर), मोहन प्रकाश पाटील (रा. जट्टेवाडी), जावेद गुलाब अंकली (रा. तेरणी), तुळशीदास लक्ष्मण जोशी (रा. कालकुंद्री), रमेश सटुप्पा कुट्रे (रा. इ. कोळींद्रे), नारायण रामु वाईंगडे (रा. कुमरी), प्रकाश राजाराम कागले (रा. अडकूर), गोपाळराव मोतीराम पाटील (रा. शिवनगे), केदारी यल्लाप्पा पाटील (रा. कालकुंद्री), नदाफ समीर मोहमद इसाक (रा. हिटणी), राजेश रघुनाथ पाटील (रा. कानडेवाडी), विलास शंकर नाईक (रा. डोणेवाडी) यांनी अपक्ष प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे. 

No comments:

Post a Comment