चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील अजिंक्य किल्ले पारगड वर शनिवार दि. १२ ॲाक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता 'आधी तोरण गडाला, मग माझ्या दाराला' हे घोषवाक्य घेऊन विजयादशमी -दसरा सीमोल्लंघन व गड स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर मार्फत आयोजित केलेल्या मोहिमेची नाव नोंदणी व स्वच्छता मोहिमेची सुरुवात सुभेदार रायबा तानाजीराव मालुसरे स्मारक किल्ले पारगड येथून होणार आहे.
ही मोहीम पूर्णपणे निःशुल्क गडापर्यंत येण्या जाण्याचा खर्च स्वतः करायचा आहे. मोहीम प्रमुखांच्या मार्गदर्शनाने सर्व नियोजित कामे होतील. आदेश न पाळणाऱ्यास मोहिमेतून कमी करण्यात येईल. अवघड ठिकाणी फोटो, सेल्फी काढणे, फिरणे यावर बंदी असेल. वन्य जीवांना त्रास व हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.
सहभागी दुर्गप्रेमींनी सह्याद्रीचा टी शर्ट व आयडी कार्ड असल्यास परिधान करून यावे. असे आवाहन दुर्ग सेवक व मोहीम आयोजक गोविंद मासरणकर व संतोष मालुसरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment