![]() |
बैठकीसाठी जमलेले ब्लॅक पॅंथर पक्षाचे कार्यकर्ते |
चंदगड /सी एल वृत्तसेवा
गेल्या अनेक वर्षापासून ब्लॅक पॅंथर पक्षाच्यावतीने चंदगड विधानसभा मतदारसंघात अनेक सामाजिक, वैयक्तिक कामे मार्गी लावली आहेत. याची जाण चंदगड विधानसभा मतदार संघातील मतदारांना आहे. म्हणूनच शिव, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे व पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी ब्लॅक पॅंथर पक्षाचा उमेदवार येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत उभा करायचाच . . .! असा पक्का निर्णय आज झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्लॅक पॅंथर पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.दीपक कांबळे होते. प्रास्ताविक व स्वागत पक्षाचे तालुका निरीक्षक विष्णू कांबळे यांनी केले. यावेळी तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून विविध समाजोपयोगी विषय घेऊन मोठ मोठी आंदोलने केली आहेत . या माध्यमातून अनेक वंचित समाजांना व नागरिकांना शासन दरबारी न्याय मिळवून दिला आहे .चंदगड मतदारसंघातील जनता ही सुज्ञ व शहाणी आहे . त्यामुळे आमच्या कामाची दखल घेऊन येथील सुज्ञ मतदार आम्हाला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाहीत . याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी व शिव,फुले, शाहु, आंबेडकर यांचे विचार व चळवळ जिवंत ठेवण्यासाठी ब्लॅक पॅंथर पक्षाचा उमेदवार उभे करणे गरजेचे असल्याचे अध्यक्ष दीपक कांबळे यांनी सांगितले. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठिंबा देऊन आजपासूनच प्रचाराला सुरुवात करण्याचे ठरविले. यावेळी बैठकीला तालुका युवा अध्यक्ष रामदास कांबळे (नांदवडे),गोव्याचे अध्यक्ष मनोज कांबळे, महिला तालुका अध्यक्षा सुप्रिया शिंदे मॅडम,कोकरेचे माजी सरपंच नारायण किरमटे,राजू कांबळे ( सुळये ), एकनाथ कांबळे, वैजनाथ कांबळे ( कडलगे), प्रकाश कांबळे ( माडवळे), युवराज कांबळे (रामपूर ),शिंदे साहेब (भोगोली ), प्रकाश कांबळे (लकीकट्टे ),दीपक आडकुरकर ( अडकूर ), भिकाजी कांबळे (भोगोली )यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाजी कांबळे (नांदवडे ) यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment