डेना कंपनीच्या सी एस आर उपक्रमातून शिनोळी येथे बांधण्यात आलेल्या मराठी शाळेचे उद्घाटन करताना कंपनी प्लांटहेड एन एस आर गुप्ता व मान्यवर |
तेऊरवाडी /सी एल वृत्तसेवा
श्री राम विद्या मंदिर शिनोळी खुर्द (ता चंदगड) येथील डेना कंपनीच्या सी.एस.आर. उपक्रमाअंतर्गत व डेना केअर फाउंडेशनच्या वतीने लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन शाळा खोल्यांचे उद्घाटन प्लांटहेड एन. एस. आर. गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश पाटील उपस्थित होते. कंपनीचे अधिकारी सूर्यकांत माने, संतोष नेसरकर, अनंत पाटील, पांडुरंग पाटील, आप्पासाहेब घोसरवाडे यावेळी उपस्थित होते. कंपनीच्या CSR उपक्रमाअंतर्गत साकारलेल्या या ज्ञानमंदिराचा उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. कंपनीच्या या स्तुत्य उपक्रमाचे आमदार राजेश पाटील यांनी कौतुक करत भागातील इतर आस्थापनांनी देखील असे उपक्रम राबवावेत असे मत व्यक्त केले. या वर्गखोल्या बांधण्यासाठी व या वास्तूचे संपूर्ण कामकाज पूर्णत्वास नेण्यासाठी डेना कंपनीचे सी.एस.आर. ऑफिसर पांडुरंग पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. ग्रामपंचायत शिनोळी खुर्द तसेच शाळा व्यवस्थापन कमिटी मार्फत कंपनीने लाखो रुपये खर्च करून गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सुसज इमारत बांधून दिल्या बद्दल आभार मानण्यात आले. यावेळी ग्रामशिक्षण समिती सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment