चंदगड : सी एल वृत्तसेवा
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) रहिवाशी कल्लाप्पा शंकर शिंदे यास मारहाण केल्याप्रकरणी कुदनूर (ता. चंदगड) येथील सचिन हिरामणी नुलेकर याच्यावर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना ४ ऑक्टोबर सायंकाळी पाचच्या सुमारास मनोहर राईस मिल रोड कुदनूर येथे घडली. याबाबतची फिर्याद जखमी कल्लाप्पा शिंदे यांने चंदगड पोलिसात दिली.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपी फिर्यादी यांच्या बहिणीचा जावई असून दोघांत नातेसंबंधातून वाद आहे. फिर्यादी शिंदे हे चार तारखेला चंदगड येथील कोर्टाचे काम संपवून कुदनूर येथे आपले मित्र लक्ष्मण पवार यांचे बरोबर बोलत उभे असता आरोपी सचिन याने अचानक शिवीगाळ करत गळपट्टी धरून लाकडी रिपेने शिंदे यास खांद्यावर व हातावर मारहाण केली. जखमी शिंदेच्या फिर्यादी वरून पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशाने पोहेकॉ जमीर मकानदार अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment