हुंड्यासाठी छळ करणाऱ्या सासरकडील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2024

हुंड्यासाठी छळ करणाऱ्या सासरकडील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल


चंदगड / प्रतिनिधी
     फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये, म्हणून मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या (जायपेवाडी -सांगेली, ता सावंतवाडी) येथील सासरच्या मंडळी विरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे . विवाहितेचे माहेर सडेगुडवळे ता.चंदगड असून तिचे सासर जायपेवाडी- सांगेली ता . सावंतवाडी आहे . पती तुषार रेमूळकर , सासू लता रेमूळकर , सासरे सुधाकर रेमुळकर , शालिनी गावडे रा . कामतवाडी -आंबोली , विकास गावडे , प्रीती ठाकूर रा.वेंगुर्ला आणिराजाराम ठाकूर रा . वेंगुर्ला या सात जणांनी हुंड्यासाठी जाचहाट छळ केला . गुजरातमध्ये फ्लॅट घेण्यासाठी दहा लाख रुपये माहेरहून आणण्याचा तगादा त्यांनी लावला होता . त्यांच्या जाचाला कंटाळून विवाहिता माहेरी आली होती . तिथेही ११ सप्टेंबर २४ रोजी सासरच्या मंडळींनी घेऊन मुलीच्या आई - वडिलांना धमकी दिली . मुलगीला नांदायला पाठवा अन्यथा आपली गय नाही , अशी धमकी देतानाच मुलगी कुणाबरोबर तरी पळून गेली असेल म्हणून मुलीची पंचक्रोशीत बदनामीही केली . त्यामुळे मुलीच्या फिर्यादीवरून सासरकडील ७ जणाविरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे . तपास पोलीस नाईक पंकज कांबळे करीत आहेत.

No comments:

Post a Comment