बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या गडहिंग्लज तालुक्यातील एकावर चंदगड पोलिसांत गुन्हा - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2024

बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या गडहिंग्लज तालुक्यातील एकावर चंदगड पोलिसांत गुन्हा


चंदगड : सी एल वृत्तसेवा
    गोवा बनावटीची दारू विनापरवाना, बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या एकास चंदगड पोलिसांनी मुद्देमालासह पकडून गुन्हा नोंद केला. गुन्ह्यातील संशयित आरोपी सुभाष मारुती गावडे (वय ४०, राहणार यमेहट्टी, तालुका गडहिंग्लज) हा गोवा बनावटीची दारू यात रॉयल ग्रँड प्रीमियम ग्रीन व्हिस्की च्या ७५० मिलीच्या ३६ बाटल्या, गोल्डन आईस ब्ल्यू फाईन व्हिस्की ७५० मिलीच्या २४ बाटल्या व१८० मिली च्या ४८० बाटल्या महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने चार चाकी सेंट्रो गाडीतून घेऊन जात होता. त्याला ड्युटीवरील चंदगड पोलिसांनी हाजगोळी (तालुका चंदगड) गावाचे हद्दीत धामणे फाटा रस्त्यावर पकडले. त्याच्याकडून कार सह एकूण १ लाख ३८ हजार ४०० रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), ९०, १०८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पो. कॉ. युवराज पाटील यांनी चंदगड पोलिसात दिली असून पोलीस सब इन्स्पेक्टर डोंबे अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment