चंदगड तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटना अध्यक्षपदी अंकुश गावडे, उपाध्यक्षपदी विक्रम ल्हासे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2024

चंदगड तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटना अध्यक्षपदी अंकुश गावडे, उपाध्यक्षपदी विक्रम ल्हासे यांची निवड

 


चंदगड / प्रतिनिधी
       चंदगड तालुका रास्त भावा धान्य दुकान संघटनेच्या अध्यक्षपदी अंकुश गावडे (कोदाळी) तर उपाध्यक्षपदी विक्रम ल्हासे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.संघटनेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.निवडीच्या वेळी तालुक्यातील सर्व धान्य दुकानदार उपस्थित होते. यावेळी रविंद्र गावडे (उमगांव), रमेश किरमटे (किरमटेवाडी), संजय गावडे (म्हाळुंगे), संजय कांबळे (पार्ले), विजय देसाई (कोळींद्रे खा.), सुनील देवन (रामपूर), परशराम मेलगे (ढेकोळी), दयानंद जोतगोंडे (मलगेवाडी), प्रकाश पाटील (धुमडेवाडी), प्रसाद बिर्जे (कानूरखु), संदीप नागरदळेकर (कुदनूर), अनिल पाटील (तेऊरवाडी), नामदेव मेलगे (ढेकोळीवाडी), नींगू पाटील (सावर्डे), बक्कर गौस(चंदगड), मीनाक्षी बोकडे (माडवळे) यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.
    यावेळी चंदगड तालुका रास्त भावा दुकानदारांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन नुतन अध्यक्ष अंकुश गावडे यानी दिले.नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा यावेळी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment