चंदगड : सी एल वृत्तसेवा
दैनिक पुढारी चे पत्रकार व चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत वैजनाथ पाटील (कालकुंद्री, ता चंदगड) यांना 'राष्ट्रीय दीपस्तंभ जीवन गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. अतुल्य भारत प्रतिभा संमेलन कोल्हापूर २०२४ कार्यक्रमांतर्गत ज्ञानसागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व स्काय इंटरनॅशनल टुरिझम या संस्थांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांनी पत्रकारिता व शैक्षणिक सेवेत राष्ट्र व समाज हितासाठी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल हा या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे चित्रपट व दूरदर्शन मालिकांतील सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद दास्ताने यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार असून यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. श्रीकांत पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment