चंदगड : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या चंदगड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. नंदाताई उर्फ नंदिनी कुपेकर बाभुळकर यांना प्रचारार्थ जवळच्या कर्नाटक राज्यातील नेतेही सक्रिय झाले आहेत. त्या अनुषंगाने बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या तडफदार आमदार व कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या चंदगड तालुक्यात प्रचारासाठी येत आहेत. त्यांची जाहीर सभा उद्या शुक्रवारी दि. १५/११/२०२४ रोजी सायंकाळी ८.०० वाजता तुडये, ता चंदगड येथे होणार आहे. या सभेसाठी तुडये पंचक्रोशीतील हाजगोळी, सुरूते, ढेकोळी, सरोळी, शिनोळी आदी सीमा भागातील गावांतील मतदार बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment