चंदगड (प्रतिनिधी) :
अथर्व दौलत कारखान्याचा ४२ वा गळीत हंगाम शुभारंभ गुरुवारी पृथ्वीराज मानसिंग खोराटे यांच्या हस्ते संपन्न झाला. दौलत-अथर्व साखर कारखान्याने यंदा ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले असून कामगार, तोडणी वाहतूकदार तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने ते नक्की पूर्ण करू असा विश्वास पृथ्वीराज खोराटे यांनी यावेळी व्यक्त केला. चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह सीमाभागातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पुरवठा करून सहकार्य करण्याचे आवाहन खोराटे यांनी केले. विधी पूजन यशवंत रामा गायकवाड दांम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनीषा मानसिंग खोराटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पृथ्वीराज खोराटे पुढे म्हणाले, ``अथर्व-दौलतचे मार्गदर्शन चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या नेतृत्त्वात कारखान्याची वाटचाल यशस्वीरीत्या सुरू आहे. कारखान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री बसवण्यात आली आहे. गाळप क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक सर्व तयारी करण्यात आली आहे. तरी यावर्षी ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कामगार, तोडणी वाहतूकदार यांची यंत्रणा सज्ज आहे. तरी भागातील सर्व ऊस पुरवठादार शेतकरी यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा आहे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सी. ई. ओ. विजय मराठे म्हणाले, ``येणार गळीत हंगाम लवकरच सुरू करणार आहे. कारखान्याने जवळपास साडेसातशे तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज केली आहे. त्यामध्ये स्थानिक टोळ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर बीड भागातील टोळ्याही बांधलेल्या केल्या आहेत. येणाऱ्या काळात शासन नियमानुसार गाळप हंगाम सुरू करणार असल्याचे सांगितले.
यावेळी दिनेश मुनोत, संगीता म्हानुगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, टेक्निकल जी. एम. मानसिंग पाटील, चीफ केमिस्ट दत्तकुमार रक्ताडे, इलेक्ट्रिक मॅनेजर सचिन नाईक, शेती अधिकारी पांडुरंग पाटील, केन यार्ड सुपरवायझर पांडुरंग सरवदे, इंजिनीयर राजकुमार देसाई, स्टोर कीपर विजयकुमार देसाई, पी.आर.ओ दयानंद देवण, सिविल इंजिनियर दीपक शिंदे, सुरक्षा अधिकारी संभाजी साळुंखे यांच्यासह पदाधिकारी, कामगार आदी उपस्थित होते.
मानसिंग खोराटे यांनी दौलत कारखान्याला गत वैभव मिळवून दिले
मानसिंग खोराटे यांनी अवसायनात गेलेला दौलत कारखाना पुन्हा सुरळीत सुरू केला. फक्त सुरू केला नाही स्वतः वैयक्तिक लक्ष घालून त्यांनी कारखान्याची यंत्रणा, डागडुजी, प्रशासन यावर काम केले. अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवली. इथेलॉनल प्लांट, डिस्टीलरी यावर लक्ष केंद्रित केले. या सगळ्यातून अवघ्या तीन वर्षात कारखान्याला संकटातून बाहेर काढून दौलत कारखाना हा टॉप पाचमध्ये आणला. त्यातून त्यांनी दौलतला गत वैभव प्राप्त करून दिले आहे.
No comments:
Post a Comment