माणगाव येथे माजी खासदार राजू शेट्टी यांची बुधवारी ऊस परिषद निमंत्रण सभा - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2025

माणगाव येथे माजी खासदार राजू शेट्टी यांची बुधवारी ऊस परिषद निमंत्रण सभा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

    माणगाव (ता. चंदगड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २४ सावी ऊस परिषद निमंत्रण सभा बुधवार दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वा येथे आयोजित करण्यात आल्याची माहीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिपक पाटील यांनी दिली. या सभेला स्वत: माजी खासदार राजू शेट्टी व संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी व उत्पादकांनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.        

No comments:

Post a Comment