शिवाजीराव पाटील यांच्या विकासाच्या व्हीजनसाठी चंदगड मधील महिला साथ देणार - सौ. समृद्धी सुनील काणेकर यांचा विश्वास - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2024

शिवाजीराव पाटील यांच्या विकासाच्या व्हीजनसाठी चंदगड मधील महिला साथ देणार - सौ. समृद्धी सुनील काणेकर यांचा विश्वास

चंदगड येथे उमेदवार शिवाजीराव पाटील यांचा प्रचार करताना सौ. समृद्धी सुनील काणेकर 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी कोणतेही पद नसताना १०० कोटीची विकासकामे केली आहे. सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. शिक्षण, आरोग्य, पर्यटन, शेती, रोजगार यासह चंदगड मतदारसंघाला भेडसविणाऱ्या प्रश्नांना न्याय देणारे नेतृत्व म्हणजे शिवाजीराव पाटील आहेत. त्यांच्या विकासाच्या व्हीजनसाठी चंदगड मधील महिला साथ द्यावी असे आवाहन भाजपच्या माजी महिला तालुका अध्यक्ष सौ. समृद्धी सुनील काणेकर यांनी केले. चंदगड शहरातील महिलांच्या भेटीगाठीवेळी त्या बोलत होत्या. 

        यावेळी त्यांनी येथील महिलांना एकत्रित करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी शिवाजी पाटील नक्कीच प्रयत्न करतील असे आश्वासन दिले. शिवाजीराव पाटील हे एकमेव नेतृत्व असून चंदगड विधानसभेचा विकास हे व्हिजन असणारा नेता आपले सर्वांचे प्रश्न सोडवेल यात शंका नाही. यासाठी त्यांच्या पाठीशी या निवडणुकीत राहण्यासाठी  महिलांनी साथ द्यावी असे आवाहन केले. 

No comments:

Post a Comment