परशराम उर्फ बाबू सुरेश नावगेकर |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
दक्षिण कर्नाटकात पर्यटनासाठी गेलेल्या एका तरुणाचा हसन शहराजवळ झालेल्या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. परशराम उर्फ बाबू सुरेश नावगेकर (वय २९, रा. मांडेदुर्ग, ता. चंदगड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवार दिनांक २ रोजी रात्री ९.३० वाजता घडली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, बेळगाव व चंदगड तालुक्यातील विविध गावचे १४ तरुण हे दिवाळी सुट्टीनिमित्त गुरुवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी बेळगावहून बंगळूर येथे पर्यटनासाठी गेले होते. हे सर्व तरुण हे शिनोळी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतमधील एकाच आंतरराष्ट्रीय कंपनीचे कामगार आहेत. शनिवारी रात्री ते हसन जवळील एका रस्त्यावर थांबले होते. यावेळी परशराम नावगेकर हा रस्ता ओलांडताना तिथून जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीने त्याला ठोकरले. यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. या घटनेची नोंद हसन पोलिसांत झाली असून घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे. मयत परशराम याच्या पश्चात, भाऊ, बहीण, आई असा परिवार आहे. त्याच्यावर सोमवार दि. ४ रोजी मांडेदुर्ग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments:
Post a Comment