महागाव / सी. एल. वृत्तसेवा
धाडस युवा संघटनेतर्फे चंदगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांना पाठींबा दर्शविला. अप्पी पाटील यांचे पुत्र श्रीशेल पाटील यांच्या बरोबर पाठींबाबाबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय झाला. अप्पी पाटील यांनी विषेश करून महिलांसाठी रोजगार निर्मिती तसेच पर्यटनासाठी विषेश करून प्रयत्न केले जातील. औद्योगिक वाढीसाठी प्रयत्न करून बेरोजगार प्रश्न सोडवू असे सांगितले.
घाडस युवा संघटनेचे तालुका पदाधिकारी चंद्रकांत पाटील यांनी अप्पी पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी विधानसभेत पाठविणे गरजेचे असून त्यासाठी घाडस संघटनेचे पदाधिकारी पाटील यांचे विचार धारा मतदारां पर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी ग्राउंड लेवल वरती काम करणार असल्याचे मत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते राकेश कोळी (देवरवाडी) संघटनेचे पद्धाधिकारी गजानन पाटील, विक्रम पाटील, प्रमोद पाटील, अविनाश पाटील, गणेश पाटील, संदीप पाटील (चिचणे), यश पाटील, राहूल पाटील व आकाश पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment