मराठी विद्या मंदिर अर्जुनवाडीचे सन २००५ - ०६ च्या इयत्ता ७ वी बॅचचे माजी विद्यार्थी
नेसरी : सी. एल.वृत्तसेवा
विद्या मंदिर अर्जुनवाडी, (ता. गडहिंग्लज) माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला .विद्या मंदिर अर्जुनवाडी या शाळेचे सन २००५-०६ या सालात शिक्षण घेत असलेले विध्यार्थी- विद्यार्थिनी इयत्ता सातवी मधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले सर्व माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा एकत्रितपणे एकाच व्यासपीठावर सर्व आजी -माजी शिक्षक यांना आमंत्रित करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. क. कांबळे होते. प्रास्ताविक किसन पाटील यानी तर आभार सौ. प्रियांका देसाई यानी मानले.
मराठी शाळेचे चित्र शाळेला भेट म्हणून देण्यात आले. तसेच शाळेतील त्या जुन्या आठवणीना उजाळा देताना माजी विद्यार्थ्यांनी आपण शाळेत असल्याचा आनंद आपल्या मनोगतातून व्यक्त केला. या वेळी तुषार धडाम, विक्रम पाटील, दीपक वाइंगडे, सौ. सोनाली दोरूगडे, सौ. प्रीतम देसाई, सौ. शीतल पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला सर्व माजी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment