किल्ला स्पर्धेत विजेत्या स्पर्धकाना बक्षिस वितरण करताना मान्यवर |
नेसरी / सी. एल. वृत्तसेवा
अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज )येथे आदर्श मराठा बॉईज अर्जुनवाडी यांच्या वतीने दरवर्षी दिवाळी सुट्टीत किल्ला स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाही या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धा गावामर्यादित ठेवण्यात आल्या होत्या.या स्पर्धेमध्ये लहान मोठ्या ५० मुला - मुलींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील प्रथम १० विजेत्यांना मंडळ कडून प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात आली, तसेच बाकी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आली.
किल्ला परीक्षण करताना किल्ला बांधणी, सादरीकरण, विद्युत रोशनाई, सजावट, किल्याबद्दलची माहिती आधारित प्रश्नांची उत्तरे या बाबींचा विचार करण्यात आला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा पाटील यांनी केले, ही स्पर्धा पर पाडण्यासाठी आदर्श मराठा बॉईज च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment