समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यासाठी 'संभाजी ब्रिगेड पक्षाचे `प्रशांत कुट्रे' मैदानात, चंदगड मतदार संघात सर्व स्तरातून वाढता पाठिंबा - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2024

समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यासाठी 'संभाजी ब्रिगेड पक्षाचे `प्रशांत कुट्रे' मैदानात, चंदगड मतदार संघात सर्व स्तरातून वाढता पाठिंबा

 

प्रशांत कुट्रे

चंदगड : सी एल वृत्तसेवा

   शिव, शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर व समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या संविधानिक मूल्यांवर आधारित लोकशाही बळकट करण्यासाठी ३३ वर्षांपासून महाराष्ट्रात मराठा बहुजन समाजाचे संघटन करणारा मराठा सेवा संघ प्रणित 'संभाजी ब्रिगेड पक्ष' यंदा प्रथमच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उतरला आहे.

   या पक्षाचे चंदगड विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार म्हणून शिवश्री परशराम उर्फ प्रशांत पांडुरंग कुट्रे हे निवडणूक लढवत आहेत त्यांचे चिन्ह आहे शिलाई मशीन'. बॅलेट युनिट मधील ६ व्या क्रमांकावरील 'शिलाई मशीन' या चिन्हा समोरील बटन दाबून मराठ्यांचा हा बुलंद आवाज विधानसभेत पाठवा असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

    मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर आणि मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे आदींनी पक्षाचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात शिक्षणाच्या खाजगीकरणाला विरोध करून त्याचे सर्वत्रिकीकरण करणार, सरकारी शाळा बंद करू देणार नाही, सर्व समाजातील मुला मुलींना केजी ते पीजी सक्तीचे आणि मोफत शिक्षण, मुलींना स्व संरक्षणासाठी प्रशिक्षण, शिक्षणावरील शासकीय बजेटमध्ये वाढ, शासकीय दवाखाने अद्यावत करून आरोग्य सुविधा मोफत करणार, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प, शेतीला उद्योगाचा दर्जा व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव, राज्यातील शेतकऱ्यांना साठ वर्षानंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन, शेतकऱ्यांच्या विमा कंपन्याकडून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालणार, त्यांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, कंत्राटी नोकरी नोकर भरती बंद करून कायमस्वरूपी नोकऱ्या, ग्रामीण भागात उद्योगांच्या उभारणीसाठी एमआयडीसी सक्षम करून स्थानिकांना शंभर टक्के रोजगार देणार, कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रयत्न, स्वयंरोजगारासाठी विनातारण २५ लाखापर्यंत कर्ज देणार,  कर्ज बुडव्या उद्योगपती व त्यांना मदत करणाऱ्या देशद्रोह्यांवर गुन्हे दाखल करून संपत्ती जप्त करणार, मराठ्यांचा सरसकट ओबीसीत समावेश व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करणार, महामानवांचे साहित्य, वांग्मय प्रकाशित करणार, २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी प्रयत्न, वाढत्या शहरीकरणाला व गुन्हेगारीला थांबवण्यासाठी प्रयत्न, महिला अत्याचार विषयक कायदे कडक करणार आदी मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

   चंदगड मतदार संघातील उमेदवार प्रशांत कुट्रे यांच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांचे मूळ गाव केंचेवाडी (ता. चंदगड) येथील श्री देव चव्हाटा मंदिर येथे पूजन करून करण्यात आला. यावेळी  गावातील प्रतिष्ठित नागरिक तालुक्यातील विविध गावांतून आलेले मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment