कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील उदयोन्मुख जलतरणपटू भगतसिंग भारत गावडे यांने शिमोगा (कर्नाटक) येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत पदकांची हॅट्रिक करून चंदगड तालुक्याचे नाव उज्वल केले.
अत्यंत अटीतटीने झालेल्या या स्पर्धेत भगतसिंग याने ५० मीटर बटरफ्लाय आणि बॅकस्टोक प्रकारात प्रत्येकी एक सिल्वर मेडल तर ५० मीटर फ्रीस्टाइल मध्ये ब्रांझ पदक अशी तीन पदके पटकावली. यावेळी त्याला मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
भगतसिंग यांने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये तब्बल ३१ हुन अधिक सुवर्ण पदके मिळवली आहेत. सध्या तो मराठी विद्या निकेतन बेळगांव येथे इयता चौथीत शिकत असून बेळगाव येथील केएलई स्विमर्स क्लब बेळगांव येथे पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे. या कामी त्याला अजिंक्य मेंडके, अजित जेंटीकट्टी, राजेश शिंदे, अतुल धुडूम, इम्रान, गोवर्धन ,सतीश यादव यांचे मार्गदर्शन तर केएलई इंटरनॅशनल स्कूल स्विमिंग पूल कुवेंपुनगर बेळगाव येथील स्टाफचे सहकार्य तर रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशुराम काकतकर, केएलई सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर कोरे, उमेश कलघटगी तसेच वडील भारत गावडे आदींचे प्रोत्साहन लाभले.
No comments:
Post a Comment