चंदगड / सी एल वृत्तसेवा
दी कॉन्झर्वेशन फाउंडेशन ऑफ इंडिया व मातोश्री विमलाबेन चंपकलाल खेतानी परिवार फाउंडेशन यांच्या माध्यमातून प्राची शेठ खेतानी यांच्या सौजन्याने आज केंद्रीय प्राथमिक शाळा इब्राहिमपूर (ता चंदगड ) येथे विद्यार्थ्यांना मायेची ऊब म्हणून स्वेटर व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील गरजू महिलांना खेतानी परिवाराकडून संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
समाजाचे आपणही देणं लागतो, समाज ऋणातून उतराई होण्याच्या शुद्ध भावनेने खेतानी परिवाराकडून ग्रामीण भागातील गरजवंतांसाठी असे उपक्रम नियमितपणे राबविले जातात.
या अध्यापक उत्तम कोकीतकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक संजय कुंभार यांनी स्वागत केले. यावेळी केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर, सरपंच तुकाराम हरेर यांनी मनोगत व्यक्त करताना खेतानी परिवार राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी सुरेखा महेंद्रभाई खेतानी, आशिष घेवडे, मितेष, प्रमोद इंगळे, माजी सरपंच निळकंठ देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ कदम, साई विद्यालय इब्राहिमपूरचे मुख्याध्यापक होडगे, ग्रामस्थ दत्तात्रय परीट, अरुण भोसले, सौ. संध्या कुंदेकर, सौ. सोनाली घोळसे, सौ. ज्योती खराडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन बैनवाड, दत्ता गावडे व विजय ढोणुक्षे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment