कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अमृत व महोत्सवी गौरव व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी ११ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर विजय घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली नितीन गडकरी (रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री भारत सरकार), माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (कोल्हापूर) यांच्या हस्ते पुरुषोत्तम खेडेकर यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सत्कार होणार आहे. यावेळी माजी खासदार व राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे- पाटील, महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव पाटील-शेळगावकर, महाकवी व लेखक इंद्रजीत भालेराव, कर्नाटक विधानसभेचे आमदार डॉ मारोतराव आण्णा मुळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक मदन पाटील लिखित 'क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर' या वैचारिक ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील तमाम मराठा बहुजन व हितचिंतक आणि उपस्थित राहावे. असे आवाहन अमृत महोत्सवी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment