चंदगड (प्रतिनिधी):
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने रवींद्र पाटील यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त आंतरराज्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. एम. गावडे होते. महात्मा फुले विद्यालय, कार्वे येथे झालेल्या बक्षीस समारंभात 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
गुडेवाडीतील गौरव रमेश पाटील (स्वामी विवेकानंद विद्यालय) याने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. प्रमुख पाहुणे उपप्राचार्य आर. बी. गावडे व अर्थतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील स्पर्धांची तयारी करण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात बी. एन. पाटील, व्ही. एल. सुतार, कमलेश कर्णिक, मोहनगेकर विविध मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक एम. एन. शिवणगेकर सूत्रसंचालन एच. आर. पाऊसकर यांनी केले. शेवटी आभार संजय साबळे यांनी मानले.
No comments:
Post a Comment