कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चंदगड शाखेच्या वतीने उपखंड कोवाड (ता. चंदगड) येथे प्रजासत्ताक दिनाच्या संध्येला व संघ शताब्दीवर्ष निमित्त रविवारी २६ जानेवारी २०२५ रोजी आत्मीय स्वयंसेवक बंधू यांच्या वतीने सघोष पथसंचलन संपन्न होणार असल्याची माहिती तालुका संघचालक आशिष दाणी यांनी दिली. धर्मजागरण प्रांत सहसंयोजक व पश्चिम महाराष्ट्र प्रांत मिलींद वाईकर हे प्रमुख वक्ते आहेत. कोवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. स्वयंसेवकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन कोवाड उपखंड प्रमुख बाळकृष्ण लोहार व कोवाड मंडल प्रमुख उत्तम वांद्रे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment