चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
मराठी साहित्य संमेलन कडोली (ता. जि. बेळगाव) आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कथाकथन स्पर्धेत खुल्या गटामध्ये कु. अनुजा दत्तात्रय लोहार (रा. निदूर, बी. एस. सी - भाग 1, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच दि. सहयाद्री, मल्टी-पूर्णज को-ऑप. सोसायटी लि., बेळगाव यांच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयीन गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला. कोवाड पंचक्रोशीत तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment