अथर्व दौलत कारखान्याची ३१ डिसेबंरपर्यंतची ऊस बिले शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा - चेअरमन मानसिंग खोराटे यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2025

अथर्व दौलत कारखान्याची ३१ डिसेबंरपर्यंतची ऊस बिले शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा - चेअरमन मानसिंग खोराटे यांची माहिती

 

दौलतचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    हलकर्णी : (ता.चंदगड) येथील अथर्व-दौलत कारखान्यानचे चालू गळीत हंगामात 2 लाख 58 हजार मे. टन  ऊसाचे गळीत झाले असुन याअगोदर दोन बिले दिली आहेत. तिसरे बिल 1‍6 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024  या कालावधीत 73842.863 मे.टन इतका ऊस कारखान्यास गळीतास आलेला आहे. या ऊसाचे बील 22 कोटी 89 लाख 13 हजार 190 रुपये कारखान्याने संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ``या वर्षीची गळीत हंगाम उत्तमरीत्या सुरु असुन, त्यासाठी अथर्व-दौलत कारखान्याने योग्य नियोजन केले असल्याने सध्या कारखाना पुर्ण क्षमतेने सुरु आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्य़ांचा ऊस वेळेत कारखान्याला यावा यासाठी शेती विभागामार्फत  तोडणी व ओढणी यंत्रणेचे चांगल्या पध्दतीने नियोजन केले आहे. सुरु गळीत हंगामात तोडणी वाहतुक कंत्राटदारांनी चांगले सहकार्य केले असून येथून पुढेही असेच सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जात आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे अथर्व-दौलत कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बीले वेळेत आदा करण्याची परंपरा कायम ठेवली असुन, ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रु. 3100 प्रमाणे ऊस बीले जमा केली आहेत. शेतकरी हाच अथर्व-दौलत कारखान्याचा केंद्रबिंदू असुन, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कारखाना नेहमीच कटिबध्द राहणार असल्याची ग्वाही चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली. 

        त्याच प्रमाणे उत्कृष्ट दर्जेदार कंपोष्ट खताची निर्मीती चालु आहे व ते लवकरच ऊस उत्पादक शेतकरी यांना माफक दरात कारखाना साईटवरुन विक्री करण्यात येईल. तरी भागातील सर्व शेतकऱ्यांनी आपले पिकाच्या भरघोस वाढीसाठी आपले शेतात कंपोष्ट खताचा वापर करावा व आपल्या जमीनीची सुपीकता वाढवावी असे आवाहन व्यवस्थापनामार्फत करण्यात आले. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस पुरवठा अथर्व-दौलत कारखान्याला करण्याचे आवाहन अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी केले. या वेळी पृथ्वीराज खोराटे, संचालक विजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, जी. एम (टेक्निकल) एम. आर. पाटील, जी. एम. (प्रोसेस) दत्तकुमार रक्ताडे, पी. आर. ओ दयानंद देवाण, फायनान्स मॅनेंजर सुनिल चव्हाण यांचेसह कारखान्याचे खातेप्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment