माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या *रस्ता सुरक्षा अभियान* उपक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2025

माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या *रस्ता सुरक्षा अभियान* उपक्रम संपन्न


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने *रस्ता सुरक्षा अभियान* उपक्रम घेण्यात आला. या अभियानासाठी कोल्हापूर आरटीओ विभागाचे अनिल भादवन, स्नेहा देसाई व ज्योती पाटील मान्यवर अधिकारी उपस्थित होते. त्यांनी स्वयंसेवकांना वाहतुकीचे नियम, हेल्मेटचा नियमित वापर, वाहन लायसन उपयोग, सीट बेल्टचा वापर, इन्शुरन्स, रस्त्यावरील सांकेतिक चिन्हांचा उपयोग, सिग्नल, त्याचप्रमाणे वाहन चालवताना मोबाईलचा  गैरवापर, सुचना फलक, वेगमर्यादा, व्यसन अशा विविध गोष्टींवर मार्गदर्शन करून स्वतःची  काळजी घेऊन आपल्या संपर्कातील सर्व व्यक्तींपर्यंत हा मेसेज पोहोचविण्याचे आवाहन केले. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. उपस्थितांना नियमासंबंधीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन कार्यक्रमाधिकारी व जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी केले. आभार डॉ. शाहू गावडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी स्वयंसेवक व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment