![]() |
कॅम्पमधील काही क्षणचित्रे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे सर्जरी कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पमध्ये चंदगड तालुक्यातील एकूण 13 मुलांचे मोफत ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन मध्ये शिश्नचर्मविकारचे 10 मुले व जिव्हा विकाराचे 3 मुले याचे ऑपरेशन झाले.
याकामी ग्रामीण रुग्णालय चंदगडचे अधीक्षक डॉ. शिवराज देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सोमजाल, शल्य चिकित्सक डॉ. खोत, भुलतज्ञ डॉ. कुपेकर, RBSK नोडल ऑफिसर डॉ. पोवार, RBSK मेडिकल ऑफिसर डॉ. पाटील व डॉ. निंबाळकर यांचे योगदान लाभले.
आपल्या लहान मुलाचे ऑपरेशन एवढ्या लहान वयात तेही चंदगड सरकारी दवाखानामध्ये उत्तम रित्या व कोणतीही गैरसोय न होता झाल्याने पालकांनी सर्व स्टाफचे आभार मानले. चंदगडमध्ये यापेक्षाही अजून चांगली मेडिकल सर्व्हिस मिळावी यासाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment