चंदगड : सी एल वृत्तसेवा
पैशांच्या देवघेव कारणावरून राजगोळी खुर्द, ता. चंदगड येथील ओलम साखर कारखाना आवारात एकास मारहाण झाली. यात जखमीच्या जबड्याचे हात हाड मोडले असून त्याला बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाजी तुकाराम पाटील वय ४२ राहणार निट्टूर, ता चंदगड असे जखमीचे नाव असून या प्रकरणी आरोपी अमित पुंडलिक आपटेकर राहणार कागणी याच्यावर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी व आरोपी एकमेकांची ओळखीचे असून त्यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद होता. जखमी फिर्यादी शिवाजी पाटील याने आपटेकर यास तू घेतलेले पैसे कधी देणार? असे विचारले असता आपटेकर यांने तुला मी पैसे परत करण्यासाठी फोन केला होता. असे हॉटेलमध्ये बसलेल्या शिवाजी असतो बाहेर ये तुला दाखवतो असे म्हणत शिवाजी हॉटेल बाहेर आला असता आपटेकर यांने काहीही न बोलता कानाच्या मागे हाताने मारले. तसेच तोंडाचे जबड्यावर बुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे तो रक्तबंबळ झाला. तोंडातून रक्त येऊ लागल्याने तेथील सिक्युरिटी यांनी शिवाजी याला जखमी अवस्थेत राजगोळी येथील खाजगी डॉक्टर कडे उपचारासाठी नेले. तिथून त्याला बेळगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्याचा जबडा फॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर दवाखाना प्रशासनाने चंदगड पोलीस ठाण्यास घटनेची वर्दी दिल्यानंतर चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल आंबुलडकर यांनी बेळगाव येथील संबंधित हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी शिवाजीच्या जबाबावरून रीतसर फिर्याद नोंदवून घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार साहेब फौजदार सावंत हे करत आहेत.
ही घटना १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास ओलम शुगर कंपनी समोर असलेल्या शेतकरी हॉटेल समोर घडली. आरोपीवर प्रत्यक्षात गुन्हा दि. २२ रोजी सकाळी दाखल करण्यात आला. जखमी शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून आपटेकर वर भारतीय न्याय संहिता कलम 117 (2 ), 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment