बेळगाव येथील अनगोळकर फाउंडेशन कडून सुरुते शाळेला १० हजार रुपयांची पुस्तके भेट - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2025

बेळगाव येथील अनगोळकर फाउंडेशन कडून सुरुते शाळेला १० हजार रुपयांची पुस्तके भेट



कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
   बेळगाव येथील अनगोळकर फाउंडेशन च्या वतीने चंदगड तालुक्यातील सुरूते प्राथमिक शाळेस विद्यार्थ्यांसाठी वाचनीय गोष्टी रूप पुस्तके भेट देण्यात आली. फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेमा पाटील यांनी पुस्तके प्रदान केली ‌. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरमू आपटेकर होते. दिव्या दिपक पाटील ह्या सदस्या हजर होत्या ‌. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत सुतार यांनी केले. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, ज्ञानात वाढ व्हावी व मोबाईल पासून दूर राहावे या उद्देशाने पुस्तके भेट दिली आहेत असे सुरेंद्र अनगोळकर यांनी मनोगतात व्यक्त केले ‌.याप्रसगी रितीका पाटील, शाळेचे मुख्याध्यापक परशराम नाईक, शिवाजी रामनकटटी, तानाजी नाईक, रेणुका सुतार, कल्लाप्पा एकणेकर आदी शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक उपस्थित होते. याकामी शशिकांत सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment