माडवळेत दुचाकी व ट्रॅक्टरची धडक, एक जण जखमी, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2025

माडवळेत दुचाकी व ट्रॅक्टरची धडक, एक जण जखमी, ट्रॅक्टर चालकावर गुन्हा

चंदगड : सी एल वृत्तसेवा
   माडवळे (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) गावाच्या हद्दीत ट्रॅक्टरच्या धडकेत एक जण जखमी झाला. ही घटना दि. १६/१/२०२५ रोजी सायंकाळी घडली. या घटनेत रामचंद्र गोविंद चांदेकर वय ७५ रा. माडवळे हे जखमी झाले असून दि. १८ रोजी सायंकाळी चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
  याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी घटनेतील जखमी रामचंद्र चांदेकर हे फतवीचे मंदिर जवळून जाणाऱ्या रस्त्याने आपली लुना गाडी ढकलत घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या गणपती मारुती गावडे, रा. माडवळे यांने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर हयगयीने, अविचाराने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून लुना गाडी व ती ढकलत जाणाऱ्या रामचंद्र चांदेकर यांना जोराची धडक दिली. यात चांदेकर हे जखमी झाले तर लुना गाडीचेही नुकसान झाले. अपघात करून आरोपी गणपती न थांबताच ट्रॅक्टरसह निघून गेला. यातील जखमी चांदेकर यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे ऍडमिट केले आहे. दवाखान्याची वर्दी तसेच जखमी चांदेकर यांची फिर्याद व पोलिसांसमोर दिलेल्या जबाबावरून आरोपी गणपती गावडे याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281, 125 (अ) सह मोटर वाहन कायदा कलम 184, 134 एक (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याची प्रत चंदगड कोर्टात पाठवण्यात आली असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोहेकॉ नाईक करत आहेत.

No comments:

Post a Comment