चंदगड : सी एल वृत्तसेवा
मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून मराठी विद्या मंदिर गुडेवाडी (ता. चंदगड) या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दोन संगणक तसेच साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली. सध्या सर्वत्र अनेक कंपन्या कार्यरत आहेत. यातील बहुतांशी गल्ला भरू असल्या तरी मेघा इंजीनियरिंग सारख्या समाजभान जपणाऱ्या कंपन्या सुद्धा अस्तित्वात आहेत. आपल्या नफ्यातील काही भाग समाजासाठी खर्च केला पाहिजे या जाणिवेतून शासकीय जिल्हा परिषद शाळांना अशा अनेक कंपन्या सुविधा पुरवत असतात. त्याच पद्धतीने मेगा इंजिनिअरिंग या कंपनीने सामाजिक जाणिवेतून गुडेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या संगणक शिक्षणासाठी दोन संगणक तसेच साऊंड सिस्टिम नुकतेच भेट दिले.
 |
जाहिरात
|
साहित्य प्रदान कार्यक्रम प्रसंगी कंपनीचे एचआर सुबराव पाटील, तानाजी पाटील यांनी भेटवस्तू शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांच्या स्वाधीन केल्या. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते महादेव सांबरेकर, कमिटी अध्यक्ष कलाप्पा आवडण, उपाध्यक्ष दशरथ नाईक, पोलीस पाटील शिवाजी लोहार, नामदेव पाटील, गजानन कोकीतकर, मारुती सुतार, ज्ञानेश्वर आवडण, ज्योतिबा आवडण, सट्टूप्पा नाईक उपस्थित होते. अध्यापक अनंत धोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करून मुख्याध्यापक यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment