राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून पं. दीनदयाळ विद्यालयात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2025

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून पं. दीनदयाळ विद्यालयात संपन्न


आजरा : सी एल वृत्तसेवा
     पंडित दीनदयाल विद्यालय आजारा येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमापूजन संस्थेचे मार्गदर्शक  प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

   यावेळी संस्थेचे सचिव  मलिक कुमार बुरुड व संचालक भिकाजी पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक  संजीव देसाई सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी व  विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment