कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्याला अभिमानास्पद असलेल्या ऐतिहासिक अजिंक्य किल्ले पारगड चे पहिले किल्लेदार व नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे सुपुत्र सुभेदार रायबा तानाजीराव मालुसरे यांचे देशातील पहिले दिमाखदार स्मारक तालुक्यातील शिवप्रेमींच्या देणगीतून गतवर्षी किल्ल्यावर साकारले आहे. या स्मारकाचे लोकार्पण दि २४ व २५ फेब्रुवारी २०२५ रोजी तालुक्याचे तत्कालीन आमदार राजेश पाटील, विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील व माजी मंत्री भरमूआण्णा पाटील तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत सर्व सरदार घराण्यातील वंशज प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडले होते. स्मारकासाठी लागणारी जमीन किल्ल्यावरील मालुसरे कुटुंबीयांनी दिली असून सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्य मावळ्यांनी श्रमदानातून स्मारकाच्या बांधकामाचे बहुतांश काम केले होते.
स्मारकाचे काम तसेच सुभेदार रायबा मालुसरे यांचा पुतळा इत्यादी कामे झाली असली तरी स्मारकाच्या सभोवती कंपाउंड भिंत व इतर सुशोभीकरणाचे काम निधी अभावी रखडले आहे. कंपाउंड भिंती अभावी परिसर बंदिस्त नसल्यामुळे मोकाट जनावरांमुळे स्मारकाचे नुकसान होऊ शकते. म्हणून संरक्षण भिंत गरजेची आहे. स्मारकाच्या सभोवती संरक्षण भिंत, सोलर लॅम्प, पेविंग ब्लॉक अशी अनेक कामे शिल्लक आहेत.
सर्व शिवभक्तांना विनंती आहे की आपण सर्वांनी या पवित्र कार्यात निधी समिधा अर्पण करावी. असे आवाहन स्मारक बांधकाम कमिटी व सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
आपली देणगी देऊ इच्छिणाऱ्या शिवभक्तांनी गुगल पे नंबर
8208388121 (प्रशांत मालुसरे) किंवा दिलेल्या बँक ऑफ इंडिया च्या क्यूआर कोडवर स्कॅन करून पाठवावी. असे आवाहन बांधकाम कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. देणगीची पावती व्हाट्सअप नंबर वर पाठवण्यात येईल.
संरक्षण भिंत व इतर कामे एकच व्यक्ती किंवा संस्था पूर्ण करून देऊ शकत असली तरी स्मारक कमिटीला हे काम शिवप्रेमींच्या देणगी सहकार्यातूनच पूर्ण करण्याचे आहे.
No comments:
Post a Comment