![]() |
वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पारेवाडी उपकेंद्रात नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ बाळंतीण व आरोग्य कर्मचारी. |
आजरा : सी एल वृत्तसेवा
वाटंगी (ता. आजरा) आरोग्यवर्धिनी पारेवाडी उपकेंद्रावर गरोदर लाभार्थी महिलेची दुसऱ्यांदा प्रसुती करण्यात येथील कर्मचारी वर्गाला यश आले. अशा या आरोग्य केंद्राचा भागातील गरोदर लाभार्थी महिलांना उपकेंद्रांचा लाभ घेवून कर्मचाऱ्यांना सेवा करणेची संधी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पारेवाडी येथे सौ.स्वप्नाली दतात्रय कांबळे या लाभार्थीची नॉर्मल प्रसुती करण्यात आली.
या उपकेंद्रात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येथील आरोग्य सेविका शिल्पा गोडंगे, विद्या पारके, आरोग्य सेवक गिरीश आजगेकर, प्रमोद कांबळे, समर्थ पाटील, युनुस सय्यद, समुदाय आरोग्य अधिकारी वैशाली सावंत, आशा सेविका सुमन कांबळे, मदतनिस शितल निकम आदींचे सहकार्य लाभले.
आजरा तालुक्यात काही आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमधून चांगली सेवा मिळत असली तरी अनेक ठिकाणी पुरेशी कर्मचारी संख्या नाही. तसेच साधन सुविधांची वानवा असल्यामुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. याकडे आपल्या जिल्ह्यातील असलेले राज्याचे नूतन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विशेष लक्ष देऊन पुरेसे आरोग्य कर्मचारी देऊन आरोग्य सुविधा बळकट करण्याची गरज चंदगड आजरा गडहिंग्लज उपविभागातून व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment