चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार कै. नरसिंगराव भुजंगराव पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त गुणगौरव व गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम शनिवार (ता. ४) रोजी शिवणगे येथील ताम्रपर्णी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस असून कार्यक्रमाचे अध्यक्ष न. भु. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळाराम पाटील हे असून स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. एस. पी. बांदिवडेकर हे आहेत.
या कार्यक्रमांमध्ये डॉ. एस. डी. गोरल. डॉ. व्यंकू कोलकार, विक्रम पाटील, स्वप्निल पाटील, संदेश पाटील, पराग येरोळकर,स्नेहल पाटील, प्रतीक्षा कदम, सोनाली नूलकर, छाया बंबर्गेकर, प्रियंका पाटील, विकास निचम, निलेश पाटील, वल्लभ पाटील, प्राची पाटील, जानवी मोहनगेकर, तुकाराम कोळापटे, वेदांत शिंदे, ऋतुजा शिंदे, नम्रता ओऊळकर, तनुजा जाधव, नम्रता ओऊळकर या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य, नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन न. भु पाटील प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment