चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलच्या वतीने रोजगार कार्ड नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. वेदिका कन्सल्टन्सी कोल्हापूरचे संचालक युवराज मिरजकर यांनी या संदर्भात सखोल असं मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना एम्प्लॉयमेंट कार्ड काढून देण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. प्रास्ताविक डॉ. आर. एन. साळुंखे यांनी केले. आभार डॉ. एस. एन. पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी डॉ. पी. एल. भादवणकर, डॉ. के. एन. निकम, डॉ. एन. के. पाटील, प्रा. व्ही. के. गावडे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment